गावकट्टा
दानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली
शेतकऱ्यांचा आपल्या शेतीकडे जाण्याचा मार्ग झाला मोकळा

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर
दि.१७/०२/२०२१
जोतिबा डोंगर ग्रुप ग्रामपंचायत विभागातील सलग्न असलेले दानेवाडी गावातील निगुड बाव येथील अतिक्रमण झालेली पाणंद खुली करण्यात आली.
महसूल विभागाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या लोक जत्रा या कार्यक्रमा अंतर्गत पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या पुढाकाराने दानेवाडी येथील निगुडबाव येथील पाणंद मार्ग मोकळा केला. गेले चाळीस वर्षे या रस्त्यावर अतिक्रमण झाले होते व रस्ता बंद झाला होता हे झालेले अतिक्रमण शेतकऱ्यांसाठी खुले केले जवळ जवळ चाळीस शेतकऱ्यांना पाणंद रस्त्यामुळे शेतीकडे जाण्याचा लाभ झाला चाळीस वर्षानंतर हा रस्ता खुला झाल्यानं ग्रामस्थांत आनंद व्य♦क्त झाला असून महसूल विभागाचे त्यांनी आभार मानले .यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे ,मंडल अधिकारी मंगेश दाने,तलाठी श्रीधर पाटील,महादेव कुंभार,ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर,ग्रामपंचायत सदस्य लखन लादे,तानाजी कदम ,पोलिस पाटील बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.