गावकट्टा

टोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा: जोतिबा डोंगर

दि.०८/०३/२०२१.

टोप ,

 

घराचा गाबा स्त्री असुन ती सुशिक्षीत झाल्यास घर सुधारते त्यामुळे एक कुटुंबसह गाव सुधारते, स्त्री ने मनात आनले तर खुप गोष्टी शक्य आहेत असे डाँ.विजय मगरे (वरिष्ट पशु अधिकारी गोकुळ संघ) यांनी टोप येथे जागतीक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रक्षिशन कार्यक्रम बोलत होते. अध्यक्ष स्थानी टोपच्या सरपंच रुपाली तावडे होत्या.

यावेळी डाँ.प्रिती दातीर यांनी महिलांचे नेतृत्व सामाजिक, राजकिय शेत्रात राखुन आपले आरोग्य कसे राखायचे यांची सविस्तर माहिती दिली तर विस्तार अधिकारी अर्चना कारंडे यांनी सेद्रिंय शेती व बायोगँस विषयी माहिती महिलांना सागितले.

यावेळी नंदकुमार मिसाळ (मंडळ कृषी अधीकारी), अभिजीत घोरपडे (कृषी अधीकारी), महादेव जाधव (कृषी सहाय्यक), संतोष पाटील ( कृषी सहाय्यक), वसिम मुल्ला (ता.तंत्रन्यान व्यवस्थापक आत्मा), सुनिता पाटील, उपसरपंच संग्राम लोहार, रंजना पाटील, अंजना सुतार, ग्रामविकास अधिकारी डी.आर देवकाते तसेच गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला शेतकरी गट उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close