गावकट्टा

जोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन

 

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.१८/०३/२०२१,

 

जोतिबा डोंगरावर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तनाचा प्रकार गुरुवारी घडला .जोतीबा डोंगर वर ग्रामीण बचत गट फायनान्स कंपन्यांचे जाळे पसरले आहे गेली अनेक वर्षे बचत गटाच्या माध्यमातून अनेक फायनान्स कंपन्यांकडून महिलाना कर्ज पुरवठा सुरू आहे याची महिलांकडून नियमित फेड देखील होत होती पण गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे जोतिबा डोंगरावर मंदिर बंद केल्यामुळे जोतिबा डोंगरावर आर्थिक फटका मोठा बसला.

महिलांनी घेतलेल्या पैशाचे हफ्ते देखील देता येईना ग्रामपंचायमध्ये मिटिंग घेऊन सर्व फायनान्स कंपन्यांना याबद्दल कळवले असताना देखील बचत गट फायनान्स कंपन्यांकडून कडून महिलांना सक्तीने वसुली सूरु केली आहे . मंगळसूत्र घाण ठेवा पण पैसे भरायचंच असे उलट सुलट बोलून महिलांना धमकवायचा प्रयत्न बचतगटाच्या वसुली अधिकार्यनाकडून होत आहे .परिस्थिती सुधारे पर्यन्त अशी वसुली थांबवावी अशी मागणी आज बचतगटाच्या महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, सुनीता बुने,आनंदा लादे यांचे कडे केली यावेळी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close