गावकट्टा

जोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

दि.२३/०३/२०२१.

जोतिबा डोंगर,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दि.१०/०३/२०२१ रोजी जोतिबा भाविकांच्या संदर्भात कोल्हापूर एस.टी .आगाराला इशारा देण्यात आला होता. पाच ते सहा दिवसांमध्ये नियमित पूर्ववत एसटी जर सुरू झाली नाही व हिरकणी कक्ष सुरू झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने खळ्खट्याक आंदोलन करण्यात येईल. तसेच महिलांच्या हिरकणी कक्षासाठी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिरकणी कक्ष उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. ST महामंडळाने याची गांभीर्याने दखल घेऊन आगार नियंत्रक श्री अजय पाटील यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला लेखी आश्वासन दिले की,आम्ही जोतिबावर दि.१६-०३-२०२१ पासून एसटी च्या नियमित फेऱ्या चालू करतो.तसेच आपल्या मागणीनुसार जोतिबा बस थांब्यावरती रिकामे असलेल्या कॅन्टीन च्या जागेत हिरकणी कक्ष (महिलांना स्तनपान करण्यासाठी सुसज्ज खोली) निर्माण करून महिला भाविकांची गैरसोय दूर करू व प्रवासी बैठकव्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करू!

यावेळी जोतिबा शाखा अध्यक्ष तसेच पन्हाळा तालुका सोशल मिडिया प्रमुख रोहित मिटके, पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे, सचिव लखन लादे, अक्षय गुरव,अमोल पांढरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close