गावकट्टा

कासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद

कोरोनाचे नियम पाळून संवाद साधला.

महाराष्ट्र लाईव्ह वृत्त सेवा : जोतिबा डोंगर

दि.२४/०२/२०२१

कासारवाडी :-

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे उद्देशाने रब्बी ज्वारी पीक उत्पादन तंत्रज्ञान विषयक शेती दिन कार्यक्रमात कोरोणाचे सर्व नियम पाळून शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात संवाद घडून आला.

यावेळी बोलताना विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्राचे डॉ.अशोक पिसाळ यांनी ज्वारी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन व बदलत्या हवामानानुसार ज्वारीचे नियोजन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.रा.छ.शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विलास करडे यांनी जैविक शेती, सेंद्रिय शेती या विषयासह ऊस पिकामध्ये सेंद्रिय पद्धतीचे व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.तर उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी ज्वारी पिकाचे नियोजन करून शेतातील खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवावा असे आवाहन केले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक कृषी पर्यवेक्षक एम एन जाधव यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शिवाजी घाडगे सर यांनी मानले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ.प्रदीप पाटील तर प्रमुख पाहुणे बाळासाहेब माने शिक्षण संस्था अंबपचे कार्याध्यक्ष विजयसिंह माने होते. प्रमुख उपस्थिती कासारवाडी सरपंच शोभाताई खोत, टोप सरपंच रूपाली तावडे, संभापुर सरपंच प्रकाश झिरंगे, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, मंडळ कृषी अधिकारी नंदकुमार मिसाळ, कृषी अधिकारी पंचायत समिती हातकणंगलेचे अभिजीत घोरपडे कृषी सहाय्यक एम. एन.जाधव यांच्यासह टोप, संभापूर, कासारवाडी गावचे उपसरपंच, ग्रा.सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी मित्र शेतकरी उपस्थित होते.

Tags

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close