गावकट्टा

कासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार

हृदय हेलावून टाकणारी घटना

 

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,

कासारवाडी प्रतिनिधी

दि.०७/०५/२०२१.

कासारवाडी येथे मंडलिक मळ्यात शेतात पाणी पाजत असलेल्या भरत वाणी याच्या अंगावरती वीज कोसळली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हकीकत अशी की कासारवाडी येथील शरद मंडलिक यांच्या शेतामध्ये काम काम करणारा मजुर भरत संभाजी वाणी मुळ गांव निर्मळवाडी,ता. वडवणी जि बीड. सध्या राहणार कासारवाडी हा उसाच्या शेतीला पाणी पाजत लिंबाच्या झाडाखाली उभा होता आज सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली यावेळी कडाडणारी वीज शेताच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर कोसळली या वेळी भरत वाणी व त्यांची दोन मुले करण वाणी व अर्जुन वाणी हे झाडाखाली उभे होते यामध्ये भरत वाणी यांच्या अंगावर ती वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा करण किरकोळ जखमी झाला.

भरत वाणी हा पत्नी व दोन मुलांसह गेल्या चार पाच वर्षांपासून कासारवाडी येथील मंडलिक मळ्यामध्ये मजुर कामास होता. उसाच्या शेताला पाणी पाजत असल्याने पत्नीला दूध घालण्यासाठी पाठवले व आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन शेतामध्ये पाणी पाजत होता.
अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close