गावकट्टा

अंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

दि.११/०३/२०२१. 

कोविड १९ (कोरोना) महामारीच्या काळामध्ये अंबपवाडी (ता. हातकणंगले) गावातील लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून लोकांचे जगणे मुश्किल झाले होते. तरी मागील वर्षाचे पाणीपट्टी व घरफळा कर वसुलीचा तगादा लावू नये. ती माफ करावी अशी मागणी अंबपवाडी शिवसेना शाखेच्या वतीने ग्रामपंचायतीला करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती चांगली असून ग्रामपंचायतीचा इतरत्र येणारा निधी मोठ्या प्रमाणात आहे. तरी याचा विचार करून कोविड (कोरोना) काळातील पाणीपट्टी माफ करावी अशा प्रकारचे निवेदन शिवसेना शाखाप्रमुख अंबपवाडीचे श्री. सागर निवृत्ती चोपडे यांनी ग्रामसेवक एल. बी.पाटील यांना सुपूर्द केले.
यावेळी निलेश खुर्द, पंडित निर्मळ, रमेश चव्हाण ,विनायक सादळकर, संदीप चव्हाण हे उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close