आरोग्य

Sensitive Skin च्या सर्व समस्या उपाय

स्किन च्या समस्या दूर करण्याचे हे १०उपाय

त्वचेचं सौंदर्य जपण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखणंही तितकचं आवश्यक असतं. परंतु, सर्व स्किन टाइप्ससाठी एकच पद्धत वापरता येत नाही. जर तुमची स्किन ऑयली असेल तर त्यासाठी काही वेगळे उपाय असतील आणि ड्राय असेल तर त्यासाठी काही वेगळे उपाय असतील.
त्वचेचं सौंदर्य जपण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखणंही तितकचं आवश्यक असतं. परंतु, सर्व स्किन टाइप्ससाठी एकच पद्धत वापरता येत नाही. जर तुमची स्किन ऑयली असेल तर त्यासाठी काही वेगळे उपाय असतील आणि ड्राय असेल तर त्यासाठी काही वेगळे उपाय असतील. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार, केयरिंग रुटीन फॉलो करणं आवश्यक असतं. परंतु, सर्वात जास्त समस्यांचा सामना त्या लोकांना करावा लागतो. ज्या लोकांची त्वचा अत्यंत सेन्सिटिव्ह असते. यांच्या त्वचेवर कोणत्याच प्रकारचं स्किन केअर रूटिन काम करत नाही. सेंसटिव स्किनसाठी एक वेगळ्या प्रकारचं स्किन केअर रूटिन फॉलो करणं आवश्यक असतं. अन्यथा अ‍ॅलर्जीशिवाय इतरही त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जाणून घेऊया सेन्सिटिव्ह त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स…

1. सर्वात आधी हे जाणून घ्या की, प्रत्येक स्किन टाइपसाठी क्लिनिंग अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्किन टाइपनुसार, क्लिंजर घ्या आणि चेहरा स्वच्छ करा. यासाठी माइल्ड सल्फेट फ्री क्लिंजर जास्त उत्तम ठरेल. कारण हे त्वचेला नुकसान न पोहोचवता त्वचा स्वच्छ करतं.

2. त्यानंतर स्किन टोनिंग करायला अजिबात विसरू नका. तसं पाहायला गेलं तर टोनिंगसाठी ग्रीन टी किंवा कॅमोमाइल टी वापरणं उत्तम ठरतं. परंतु, त्वचेवर पिंपल्स असतील तर अल्कोहोल फ्री टोनरचा वापर करा.
3. स्किन सेंन्सिटिव्ह आहे, म्हणून अशा मॉयश्चरायझरचा वापर करा ज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे फ्रेगरेंस म्हणजेच गंधाचा वापर केला नसेल. त्यामुळे अ‍ॅलर्जी किंवा इरिटेशनची समस्या होऊ शकते.

4. त्यानंतर त्वचेवरील मृत पेशी म्हणजेच डेड स्किन सेल्स काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लाइट एक्सफोलिएटिंग स्क्रब यूज करा. फेशिअल मास्क म्हणून केओलिन क्लेचा वापर करा. हे त्वचेला नुकसान न पोहोचवता मृत पेशी दूर करतात.
सेन्सिटिव्ह स्किन असेल तर चेहरा स्वच्छ करताना जास्त थंड किंवा गरम पाण्याचा वापर करू नका.

6. ज्या प्रोडक्टमध्ये रेटिन ए, बेन्जॉइल परऑक्साइड आणि सॅलिसिलिक अॅसिड त्वचेसाठी वापरणं शक्यतो टाळाच.

7. ज्या सनस्क्रिनमध्ये झिंक आक्साइड असलेले सनस्क्रिन वापरा. ते त्वचेसाठी सुरक्षित मानले जातात.
8. जेव्हाही संधी मिळेल त्यावेळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने चेहऱ्यावरील घाण दूर होते आणि स्किन हायड्रेटही राहते. याव्यतिरिक्त प्रखर ऊन्हापासून त्वचेचं रक्षणं करणही आवश्यक असतं.

9. सेन्सिटिव्ह स्किनवर प्रत्येक फेस मास्क काम करत नाही. त्यासाठी दही आणि ओट्स एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे फायदा होईल आणि चेहऱ्याचं मॉयश्चरायझर टिकवून राहण्यास मदत होईल.

10. या टिप्स फॉलो करण्याव्यतिरिक्त खूप पाणी प्या आणि अॅलर्जीचं कारण ठरणाऱ्या पदार्थांपासून दूर रहा. तळलेले, भाजलेले आणि डाएटमध्ये सीझनल पदार्थांचा समावेश करा.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Tags

Vikram Chougale

Contact ME : 9923673632

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close