कृषीवार्ता

अथणी शुगर लि.भुदरगड युनिटची ३१ डिसेंबरपर्यंतची ऊस बिले बँकेत जमा

महाराष्ट्र लाईव्ह न्युज वृत्तसेवा: जोतिबा डोंगर

सौजन्य: निप्पानी नगरी न्युज

अथणी शुगर लि. भुदरगड युनिट कारखान्याचे आज अखेर दोन लाख 33 हजार 215 मेट्रिक टन गाळप झाले आहे 11.23 या रिकव्हरीने दोन लाख 57हजार 965 क्विंटल इतकी साखर उत्पादन झाले आहे शेतकऱ्यांच्या व संघटनांच्या मागणीनुसार चालू वर्षीचा पहिला हप्ता 2800 रुपये जाहीर केल्याप्रमाणे ३१ डिसेंबर पर्यंत गाळपास आलेल्या उसाची सर्व बिले बँक खात्यावर जमा केलेले आहेत तरी शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन आपली ऊस बिले तपासावीत तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे अशी माहिती कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटीलसो यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आव्हान केले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत चीफ इंजिनियर श्री नामदेव भोसले, कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई ,चीफ केमिस्ट श्री खटावकर मुख्य शेती अधिकारी एल बी देसाई, जमीर मकानदार ,कन्हैया गोरे, सतीश पाटील,सुनील घुगरे, शशिकांत थोरवत ,खरुडेसो ,दिलीप गायकवाड ,जगदीश घोरपडे ,श्रीधर पाटील, संताजी देसाई व कारखान्यातील सर्व कर्मचारी वाहतूक कंत्राटदार व शेतकरी उपस्थित होते.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close